Latur Society Election | तगरखेडा सोसायटीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील सोसायटीवर काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या तेराही उमेदवारांचा विजय
Nilanga Tagarkheda society  Congress panel victory
Nilanga Tagarkheda society Congress panel victoryPudhari
Published on
Updated on

Nilanga Tagarkheda society Congress panel victory

निलंगा : निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक रविवारी झाली. त्यात काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या तेराही उमेदवारांचा विजय झाला आहे. निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करून, गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.

तगरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची ७२० सभासद संख्या आहे. तसेच ३.२५ कोटी भाग भांडवल आहे. या सोसायटीच्या १३ संचालकांच्या निवडीसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे रविवारी मतदान झाले. त्यात ५१९ पात्र मतदारांपैकी ४६१ मतदारांनी मतदान हक्क बजावला. त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात आला. त्यात माजी सरपंच वैजनाथप्पा वलांडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुरस्कृत पॅनलने निर्विवाद विजय मिळविला.

Nilanga Tagarkheda society  Congress panel victory
Latur News : पाच दिवसांपासून नेटवर्क ठप्प

विजयी उमेदवार...

विजयकुमार कलगणे, सोमनाथ गुत्ते, शिवाजी थेटे, संजय थेटे, सोपान बिरादार, विष्णू मुळजे, रमेश राघो, जमीर शेख, लक्ष्मण म्हेत्रे, विश्वनाथ बाकारे, मंगलबाई पाटील, लक्ष्मीबाई बिरादार, सुग्रीव सूर्यवंशी हे निवडणुकीत विजयी झाले आहेत.

विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या विजेत्यांचे स्वागत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, सरपंच केवळाबाई सूर्यवंशी, उपसरपंच मदन बिरादार, माजी सरपंच वैजनाथ वलांडे यांनी केले.

Nilanga Tagarkheda society  Congress panel victory
Latur Jalswarajya Scheme Scam | लक्कड जवळगा जलस्वराज्य प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. एस. किलचे यांनी काम पाहिले. त्यांना अजित कडतणे, शिवाजी कुंभार, शिवाजी जवळगेकर, सतीश माने, डी. डी. मरे, गणेश कुंभार, बालाजी सोनवणे, मारुती कांबळे यांनी साहाय्य केले. औराद पोलिस ठाण्याचे पीएसआय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news