Latur Crime : निलंगा तालुक्यात माणुसकीला काळिमा! ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार; नराधमाला अटक

Latur Crime : निलंगा तालुक्यात माणुसकीला काळिमा! ५२ वर्षीय महिलेवर अत्याचार; नराधमाला अटक
Published on
Updated on

निलंगा : निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथे एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. घरात काम करत असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचे तिच्याच साडीने हात-पाय बांधून एका २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुधवार, २२ एप्रिल रोजी घडली. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पानचिंचोली येथील पीडित महिला बुधवारी आपल्या घरात नेहमीप्रमाणे काम करत होती. दुपारी घरामध्ये कोणी नसल्याची संधी साधून गावातीलच प्रवीण बंकट जाधव (वय २५) हा घरात घुसला. त्याने महिलेला प्रतिकार करण्याची संधी न देता, तिच्याच साडीने तिचे हात-पाय बांधले आणि तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, "हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला याच ठिकाणी जिवे मारून टाकीन," अशी धमकी देऊन तो पसार झाला.

पोलिसांची तत्परता; आरोपीच्या मुसक्या आवळल्या

या घृणास्पद प्रकारानंतर पीडित महिलेने धीर धरून घडलेला प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपी प्रवीण जाधव याला काही तासांतच बेड्या ठोकल्या आहेत.

कठोर शिक्षेची मागणी

या प्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगाराला जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पानचिंचोली ग्रामस्थांसह सर्व स्तरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news