Latur News : आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अभूतपूर्व महामोर्चा

लातूर : उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करा; मोर्चेकऱ्यांची मागणी
Latur News
Latur News : आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ अभूतपूर्व महामोर्चाfile photo
Published on
Updated on

Latur News : Unprecedented march in support of reservation sub-categorization

लातूर, पुढारी वृत्तसेवा अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तात्काळ लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. २७) लातूर शहरात समस्त मातंग समाज व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण संघर्ष समिती, लातूर जिल्ह्याच्या वतीने काढण्यात आलेल्याम भव्य महामोर्चाचे लातूरकरांचे लक्ष वेधले. या महामोर्चात जिल्हाभरातून महिला, पुरुष, युवक-युवती तसेच ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येनेसहभागी झाले होते.

Latur News
Jan-Aakrosh Morcha : जाफराबादच्या जनआक्रोश मोर्चाची जय्यत तयारी

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून अण्णाभाऊ साठे चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. आ. अमित गोरखे, आ. सुनिल कांबळे. माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, अण्णाभाऊंचे नातू सचिन साठे, माजी आ. सुधाकर भालेराव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. अनेक मोर्चेकऱ्यांच्या हातात संविधानाच्या मूल्यांचा गौरव करणारे तसेच सामाजिक न्यायाची मागणी अधोरेखित करणारे फलक तसेच महापुरुषांचे फोटो होते. मोर्चात सर्ववयोगटातील समाजबांधव, महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या.

अनेकांच्या हातात पिवळे ध्वज व डोक्यावर जय अण्णा असा मजकूर असलेल्या टोप्या होत्या. आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याची ते मागणी करीत होते. या महामोर्चामध्ये लातूर जिल्ह्यातील मातंग समाजासह अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध जातींचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Latur News
Jalna News : आष्टीत सर्रास गुटखा विक्री; अन्न व औषध प्रशासनानचे दुर्लक्ष

शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करत मोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचला. संपूर्ण मार्गावर उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चा पोहचला असता त्याचे सभेत रुपांतर झाले. आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. मोर्चा शांततापूर्ण वातावरणात पार पडला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. हा महामोर्चा लातूरमध्ये चर्चेचा विषय ठरला.

logo
Pudhari News
pudhari.news