Latur news | रंगकाम करताना उंचावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कळसाला रंग देताना काळाचा घाला: शिरनाळ येथे उंचावरून पडून तरुण रंगकामगाराचा जागीच मृत्यू
Latur news | रंगकाम करताना उंचावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

चाकूर: तालुक्यातील शिरनाळ येथे एका तरुण कामगाराचा मंदिराच्या शिखराला रंगकाम करताना उंचावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी (४ एप्रिल) सकाळी १० वाजेच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. बुद्धभूषण सुधाकर कांबळे (वय २४, रा. उमरज, ता. कंधार) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरनाळ येथील हनुमान मंदिराच्या रंगकामाचे काम सध्या सुरू आहे. शनिवारी सकाळी बुद्धभूषण हा मंदिराच्या कळसाला पेंटिंग करत होता. मात्र, काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट जमिनीवर कोसळला. उंचावरून पडल्याने त्याला गंभीर इजा झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई आणि तपास

घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी सुधाकर धोंडीबा कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार सूर्यकांत धाकपाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचा अशा प्रकारे कामावर असताना अंत झाल्याने उमरज आणि शिरनाळ परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कष्टाळू हात कायमचा सुटल्याने कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news