Latur News : मुनीमाचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; गावकऱ्यांनी मिरवणूक काढत केला सत्कार

जिद्द, निरंतर अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर जळकोट येथील एका मुनीमाच्या मुलाने पोलिस उपनिरक्षकपदाला गवसणी घातली आहे.
Latur News
Latur News : मुनीमाचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; गावकऱ्यांनी मिरवणूक काढत केला सत्कारfile photo
Published on
Updated on

Latur News : Munima's son becomes police sub-inspector; Villagers Felicitate Him with a Procession

जळकोट, पुढारी वृतसेवा : जिद्द, निरंतर अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर जळकोट येथील एका मुनीमाच्या मुलाने पोलिस उपनिरक्षकपदाला गवसणी घातली आहे. इसराईल शादुल शेख ऊर्फ घोणसे असे या यशवंताचे नाव आहे. या निवडीने गावकऱ्यांना आनंदाचे भरते आले व त्यांनी इसराईल शेख याची गावात मिरवणूक काढून त्यांचा भव्य नागरी केला.

इसराईलच्या या यशाला जिद्दीची किनार आहे. त्यांचे वडील शादुल शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून किराणा दुकानावर मुनीम म्हणून काम करतात. त्याचे आजोबाही मुनीमच होते. आई मोलकरीण म्हणून काम करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी हातभार लावते. ही पार्श्वभूमीच इसराईलच्या यशाला बळ देणारी ठरली.

ती बदलण्यासाठी आपण स्पर्धा परीक्षा दिली पाहीजे व यश मिळवून अधिकारी झाले पाहीजे असे स्वप्न त्याने पाहिले व ते वास्तावातही आणले गरिबीवर मात करीत मिळविलेले हे यश तालुक्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. प्रारंभी पोलिस कॉन्स्टेबल म्हणून शासकीय नोकरीत दाखल झालेले इसराईल शेख यांनी अत्यंत मन लावून आपली सेवा सुरू ठेवली.

त्याचवेळी त्यांना पोलिस उपनिरीक्षक पद खुणावत होते. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची जोरदार तयारी सुरू ठेवली. अखेर त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांची ही निवड झाल्याचे कळताच जळकोट शहरातून इसराईल शेख यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

जळकोट नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथ किडे, नगरसेविका सुरेखा गवळे, नगर-सेवक खादर लाटवाले, नगरसेवक अजीज मोमीन, पत्रकार एम. जी. मोमीन, सोमेश्वर सोप्पा, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, महेताब वेग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष बाबा घोणसे यांच्या हस्ते ग्रामस्थांच्या वतीने इसराईल शेख यांचा सत्कार करण्यात आला.

२०२२ मध्ये लोकसेवा आयोगाची पहिली परीक्षा दिली पण जवळून अपयश मिळाले. त्यानंतर जिद्द न सोडता कठोर परिश्रम घेतले. सतत अभ्यास केला. परीक्षा देतच राहिलो. आणि अखेर मेहनतीच्या जोरावर मी पोलीस उपनिरीक्षक झालो अशी आपल्या खडतर प्रवासाची कहानी सत्काराला उत्तर देताना इसराईल शेख यांनी सांगितली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news