

उदगीर : प्रॉपर्टीच्या वाटणीचा व अनैतिक संबंधाचा वाद विकोपाला गेल्याने एका २४ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना उदगीर ग्रामीण हद्दीत घडली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी महिलेसह एका आरोपीवर BNS कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारोती नरसिंह दहीकांबळे वय ७०, रा. नाबंदी ता. उदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा उध्दव मारोती दहीकांबळे वय २४हा संत ज्ञानेश्वर नगर, निडेवन उदगीर येथे भाड्याच्या घरात राहत होता. दि. १२/०६/२०२६ रोजी रात्री ०२:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी वंदना तुळशीराम मादळे, रा. नाबंदी ह.मु. उदगीर हिने उध्दवसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून आणि त्याच्या वाटणीला येणारी जमीन/प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्याच्या कारणावरून त्याच्या तोंडावर गरम तेल ओतले.
गंभीर भाजल्याने उध्दववर लातूरच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान दि. २२ रोजी पहाटे ०४ :३०वाजता त्याचा मृत्यू झाला. मयत उध्दवच्या वडिलांच्या फिर्यादीवरून दि. २३/०६/२०२६ रोजी ००३४ वाजता उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची नोंद पोउपनि गजानन काळे यांनी केली असून पुढील तपास सपोनी माधव बेंबडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दि. २३/०६/२०२६रोजी ०० :३५वाजल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, पोनी दिलीप गाडे, सपोनी माधव बेंबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व तपासकाम केले.
जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गरम गोडतेल तोंडावर ओतून जिवे ठार मारण्यास कारणीभूत होते मयताचे भाड्याचे घर, संत ज्ञानेश्वर नगर, निडेवन उदगीर, शहरालगतचा भाग पोलिसांनी आरोपी वंदना मादळे हिला ताब्यात घेऊन तपास सुरू असल्याचे सांगितले.