Latur Heavy Rain : औसा तालुक्यात पावसाचा कहर, शेतकरी हवालदिल

हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान, आलमला-भादा वाहतूक बंद
औसा  (लातूर)
औसा तालुक्यात पावसाचे तांडव सुरूच असून भादा परिसरात सोयाबीन असे पाण्याखाली गेले आहे. Pudhari News Network
Published on: 
Updated on: 

औसा (लातूर) : औसा तालुक्यात मंगळवार (दि.16) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. आलमला, भादा, उटी, नागरसोगा, दापेगाव, जवळगा पो परिसरात जोरदार पावसामुळे शेतजमिनीतील पिके मातीसकट वाहून गेली असून खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे.

औसा  (लातूर)
अलमला-भादा पुलावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.Pudhari News Network

दरम्यान, धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तावरजा प्रकल्पाचे तब्बल १२ दरवाजे उघडण्यात आल्याने तावरजा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आलमला-तांडा जोडणारा पूल तसेच औसा-भादा आणि औसा आलमला मार्गावरील पुलावरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. औसा, नागरसोगा, हळदुर्ग, उटी, सत्तरधरवाडी परिसरातील गावांतील सोयाबीन पिकात पाणी थांबल्याने शेताना तळ्याचे स्वरूप आले आहे.

औसा  (लातूर)
लातूर, नांदेडमध्ये मुसळधार; सात मंडळात अतिवृष्टी

त्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले नुकसान झाले. तूर पिवळी पडली आहे. अजूनही तालुक्यातील आलमला, उटी, भादा परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्यात आहेत. नदीलगतच्या शेतांतील सोयाबीन, तूर आणि इतर खरीप पिके पाण्यात बुडून गेल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही भागात शेतं तळ्याचे स्वरूप धारण करत आहेत. तूर पिवळी पडली असून खरीप हंगाम धोक्यात आल्याची स्थिती आहे. सततच्या पावसामुळे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले असले तरी अनेक ठिकाणी काम सुरू होऊ शकलेले नाही. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गान हिरावून घेतला असून शासनाने तात्काळ 'ओला दुष्काळ' जाहीर करून सरसकट एकरी २५ हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.