

लातूर : लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालीहोती. त्या अतिवृष्टीने शेतीपिकांसह शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे. सदर मदत मिळण्यास सुरुवात झाली असली तरी सर्वच शेतकयांना दिवाळीपूर्वी या मदतीची रक्कम मिळावी आणि रब्बीच्या पेरणीसाठी जी मदत होणार आहे. ती मदत पेरणीच्या पंधरादिवस अगोदर व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.
मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीने शेतकयांच्या हातातून खरीप हंगाम गेलेला असून काही शेतकयांच्या शेतजमिनी खरडून गेलेल्या आहेत. त्याच बरोबर नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. या पंचनाम्याच्या अहवालावरून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकयांची परिस्थिती लक्षात घेवून आजपर्यंतचे सर्वात मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकयांना मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यातील काही शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणून देत माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी शेतकयांची दिवाळी गोड व्हावी या करिता अतिवृष्टीबाधित सर्वच शेतकयांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर शासनाच्या वतीने रब्बीच्या पेरणीसाठीही मदत जाहीर केली आहे. सदर मदत रब्बी पेरणीच्या पंधरा दिवस अगोदर मिळावी, जेणेकरून शेतकयांना पेरणीसाठी खत व बियाणे खरेदी करणे शक्य होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शविली असून जिल्ह्यातील सर्वच शेतकयांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असा विश्वास आ. निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे.