लातूर : टँकरमधून गांजाची तस्करी;१ कोटी ९ लाखाचा मुद्देमाल जप्त

उदगीर पोलिसांची धडक कारवाई
Latur ganja smuggling
टँकरमधून गांजाची तस्करी
Published on
Updated on

उदगीर : येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी (दि.२) गुप्त माहितीच्या आधारे २ किलो गांजाची वाहतूक असताना पकडला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीना अटक करून सखोल चौकशी केली असता हा दोन किलो गांजा हे सॅम्पलसाठी असून उर्वरित तीन क्विंटल गांजा तालुक्यातील हाकनकवाडी शिवारात एका टँकरमध्ये असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार शुक्रवारी (दि.५) ग्रामीण पोलिसांनी त्या टँकरची झडती घेतली असता त्यामध्ये ३ क्विंटल २ किलो गांजा आढळून आला. यानंतर पंचायत समक्षसदरील गांजाचा पंचनामा करून गांजा, वाहतुकीसाठी वापरलेले टँकर, एक कार असा एकुण १ कोटी ९ लाख ५० हजाराचा जप्त करण्यात आला.

Latur ganja smuggling
घृणास्पद ! पाळीव प्राण्यांना मारून अवयवांची तस्करी

याबाबत ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, बुधवारी ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत २ किलो गांजासह पांढऱ्या रंगाची कार असा एकूण २ लाख ५० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी अमोल ज्ञानोबा गोरे (रा .वडवळ नागनाथ ता . चाकूर) व एक संशयित महिला आरोपीला अटक करण्यात आली होती. या संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळाल्याने त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की , हा २ किलो गांजाचे पॉकेट हे सिम्पल असून लातूर, नांदेड, नाशिक येथील गांजा विकणाऱ्या लोकांना सॅम्पल दाखवण्यासाठी याचा उपयोग करत होते. बाकीचा गांजा हा एका टँकरमध्ये टाकून विशाखापटनम येथून देगलूर मार्गे उदगीर येथे आणला आहे. रस्त्याने संशय येऊ नये म्हणून तेलाच्या टँकरचा उपयोग करीत असल्याची कबुली त्यांनी दिली. यासाठी टँकर चालक आरोपी अमोल गोरे याच्यासोबत सदर गुन्ह्यामध्ये आरोपी लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके (सर्व रा. वडवळ नागनाथ ता . चाकूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शुक्रवारी संशयित आरोपीने दिलेल्या कबुलीनुसार तालुक्यातील हाकनकवाडी शेत शिवारामध्ये एका शाळेच्या पाठीमागे उभा केलेला टँकर (क्रमांक एम एच ४६ / ए आर ०६५९) यामधून १४ पोते गांजा वजन ३ क्विंटल २ किलो आढळून आला. याची किंमत अंदाजे ७५ लाख व टँकर किंमती ३२ लाख, २ लाख किंमतीची कार असा एकूण १ कोटी ९ लाख ५० हजार किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार फुलारी , पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, गणेश कदम , रवींद्र तारु परशुराम देवकते, आयुब शेख, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, संतोष शिंदे, प्रदीप घोरडे, राहुल नागरगोजे, अंगद कोतवाड, नामदेव चेवले, महबूब सय्यद, भीमाशंकर फुलारी, अभिजीत लोखंडे, राम बनसोडे, निजामुद्दीन मोमीन, तुकाराम कज्जेवाड, अर्जुन तिडोळे, जुल्फेकार लष्करे, तांत्रिक सहाय्य पोलिस अंमलदार संतोष देवडे, गणेश साठे यांनी केली.

Latur ganja smuggling
सांगली : गुटखा विक्री थांबेना, कर्नाटकातून होतेय तस्करी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news