‎Latur Diesel Theft | पंप मालकानेच पकडली टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी

‎अनेक दिवसांपासून सुरू होता इंधन चोरीचा गोरखधंदा
‎Latur Diesel Theft
‎Latur Diesel Theft
Published on
Updated on

‎‎औसा :   अनेक वर्षांपासून महामार्गावर खुलेआमपणे चालणाऱ्या पेट्रोल-डिझेल टँकर मधून चोरीच्या गोरखधंद्याचा पंप मालकाच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला असून ‎याबाबत भादा पोलिसात गुन्हा  नोंद करून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनी अटक केली आहे.

‎याबाबत माहिती अशी की मुखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंप मालकाला पेट्रोल - डिझेल टँकर मधून कमी इंधन येत असल्याचा संशय येत होता. त्यांनी याबाबत शहानिशा करण्याचे ठरवले. त्यांनी सोलापूर येथून टँकर भरून निघाल्यानंतर १०० किलोमीटर टँकरचा पाठलाग करून औसा तालुक्यातील येल्लोरी पाटीवर टँकरमधील पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

सोलापूर येथील धर्मेंद्र ट्रान्स्पोर्टचा एक टँकर (क्र. एम एच १३ सीयू २४३५) मुखेड तालुक्यातील महालक्ष्मी पेट्रोल पंपासाठी पेट्रोल घेऊन सोलापूरहून औसा मार्गे निघाला होता. टँकर चालक पिंटू जगन्नाथ वर्मा आणि मुखेड येथील पंप व्यवस्थापक ज्ञानेश्वर मारोती नरवाडे यांनी संगनमत केले. टँकर चालक वर्मा आणि व्यवस्थापक नरवाडे यांनी विश्वासाने सोपवलेल्या टँकरमधील पेट्रोलची चोरी करण्यासाठी औसा येथील येल्लोरी पाटीवर टँकर थांबवले. याच दरम्यान, पंप मालक भगवानराव पाटील यांनी संशयावरून डेपोपासूनच टँकरचा पाठलाग सुरू केला होता. १०० किलोमीटरपर्यंत टँकरचा पाठलाग केल्यानंतर त्यांना येल्लोरी पाटीवर टँकरमध्ये गेल्याचे दिसले. पाटील आत गेले असता  टँकरमधून अंदाजे ६० लिटर पेट्रोल सुमारे (६३०० रुपये) काढून घेताना चे संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले आणि व्यवस्थापक नरवाडे व टोळीला पाटील यांनी याला पकडून भादा पोलीस ठाण्यात आणले.

‎खुलेआम चालणाऱ्या इंधन चोरीमुळे प्रश्नचिन्ह?

‎‎वर्षानुवर्षे महामार्गालगतच्या पाटीवर हा अवैध धंदा बिनधास्तपणे सुरू होता. 'हा गोरखधंदा सर्वांच्या सहकार्याने चालत असून, जागोजागी टोळ्या सक्रिय असल्याने बिनधास्तपणे पंप मालकाची लूट केली जात आहे,' अशी माहिती भगवानराव पाटील यांनी दिली. ट्रान्स्पोर्ट चालकाच्या फिर्यादीवरून भादा पोलिसांनी टँकर चालक वर्मा, पंप व्यवस्थापक नरवाडे आणि इतर तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या संबंधित कलमांनुसार (BNS ३१६, (३) ३ (५) नुसार) गुन्हा दाखल केला आहे. फौजदार पुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news