Latur crime | बोळेगाव येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; पती-सासू-सासऱ्यांवर खुनाचा आरोप

या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील बोळेगाव येथे एका विवाहित महिलेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पती, सासू व सासऱ्यांवर छळ करून खून केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

अनुसया प्रशांत कांबळे (रा. नागेशवाडी, ता. चाकूर) असे मृत महिलेचे नाव असून तिचे लग्न २०१९ मध्ये बोळेगाव येथील प्रशांत गणपत कांबळे यांच्याशी झाले होते. या दांपत्याला अनुष्का व सुशांत अशी दोन मुले आहेत.

मृत महिलेच्या आई-वडिलांच्या म्हणण्यानुसार, पैशांसाठी व सोन्यासाठी अनुसयाचा सतत छळ करण्यात येत होता. तिला फोनवर बोलू दिले जात नव्हते, तसेच मानसिक त्रास दिला जात होता. मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजता बोळेगाव येथील काही नागरिकांनी अनुसयाच्या वडिलांना फोन करून ती विहिरीत पडल्याची माहिती दिली.

ही माहिती मिळताच सकाळी सुमारे ७ वाजता अनुसयाचे नातेवाईक शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अनुसयाला पती प्रशांत कांबळे, सासू कुसुमबाई कांबळे व सासरे गणपत कांबळे यांनी मारहाण करून विहिरीत टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news