लातूर: प्रसिद्धीसाठी महापुरुषाबद्दल काहीजणांकडून आक्षेपार्ह वक्तव्ये

Latur News | लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Latur News
शिवेंद्रसिंहराजे भोसलेPudhari Photo
Published on
Updated on

लातूर : प्रसिद्धीच्या मोहासाठी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्याची फॅशन झाली असून याला जरब बसावी म्हणून अशा मानसिकतेच्या लोकांना जेलची हवा दाखवली पाहिजे. त्यांना लवकर जामीन मिळू नये असा कायदाही केला पाहिजे व यासाठी शासन सकारात्मक असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे दिली.

भोसले म्हणाले महापुरुषाबद्दल विधाने केली की विनासायास प्रसिद्धी मिळते. आपण टीव्हीवर दिसतो, पेपर मध्ये झळकतो हे या लोकांना कळाले आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास न करता इतिहासाची तोडमोड करीत काहीतरी मुद्दाम बोलायचे तथापि असे प्रकार थांबले पाहिजेत. ते करणाऱ्यांना चार-पाच दिवस जेलमध्ये टाकले पाहिजे. विद्यमान कायद्यामध्ये अशा प्रकरणात गुन्हा दाखल झाला तरी जामीन लवकर मिळतो त्यासाठी कायद्यात सुधारणा केली पाहिजे . लवकर जामीन मिळू नये व कठोर शिक्षा व्हायला हवी असा कायदा केला पाहिजे व शासन त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले .

दरम्यान पुणे येथे घडलेल्या घटनेबद्दल संताप व्यक्त करीत स्त्रियावरच्या अत्याचाराच्या घटना ही मानसिक विकृती असल्याचे त्यांनी सांगितले. अशी मानसिकता समाजातून हद्दपार होणे गरजेचे आहे. पुणे येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून हा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना कोठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी यंत्रणा व शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news