

Latur Congress Workers Agitation
जळकोट : लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूर दौ-यात केले होते. लातूरचे भूषण, लातूरची अस्मिता, लातूरचे उत्तुंग नेतृत्व असलेल्या माजी मुख्यमंत्री, लोकनेते दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेस (आय ) कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पसरला असून जळकोट येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आज (दि.८) निषेध आंदोलन केले.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे लातूर शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्या निषेधार्थ जळकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध करण्यात आला.
रवींद्र चव्हाण यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे नेते बाबुराव जाधव, युवा नेते सचिन राजेंद्र केंद्रे, शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, महेताब बेग, अक्षय बडगिरे, विश्वनाथ इंद्राळे, संग्राम कांबळे,
अनिल सोनकांबळे, ज्ञानोबा पाटील, उत्तम मुंडकर, माजी सरपंच संभाजी कोसंबे, राम नामवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संग्राम नामवाड, प्रमोद दाडगे, हावगी स्वामी, सुधाकर सोनकांबळे, मैनोद्दिन बिरादार, सरपंच सुनिल नामवाड, अनिल सोनकांबळे आदी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या चुकीच्या वक्तव्याबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या.