

चाकूर : येथील मागासवर्गीय मुलं आणि मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या इमारत बांधकामास शासनाने २८ कोटी ५५ लाख ६४ हजार ५३६ रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे २८ वर्षांपासून भाडेच्या जागेत असणाऱ्या वसतिगृहाचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
तालुक्यातील हणमंतवाडी येथील १० एकर जागा वसतिगृहासाठी मिळावी म्हणून पुढारीने वेळोवेळी बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता वसतिगृहाबरोबर एक निवासी शाळा उभारण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाच्या वतीने मागासवर्गीय मुलींसाठी २४ जानेवारी १९९६ रोजी लातूर नांदेड रोड तर २८ जून २००७ मध्ये मुलांचे वसतिगृह झरी रोड येथे खाजगी जागेत भाडेतत्वावर सुरू केले आहे. वसतिगृहाच्या बांधकामासाठी समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनेक वर्षापासून जागेची पाहणी केली, परंतु जागा उपलब्ध होत नव्हती. हणमंतवाडी येथील शासकीय गायरान जमिनीमध्ये सहा एकर जागा वसतिगृहासाठी उपलब्ध झाली आहे.
शासनाकडून दोन्ही वसतिगृहासाठी प्रत्येकी १४ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्थ्याच्या इमारीती विद्याथ्यर्थ्यांसाठी अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. मुला मुलींच्या वसतिगृहाची स्वतःची इमारत उभारण्यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाला अनेकदा प्रस्ताव पाठवून दिले होते. जमीन मिळत नसल्याने जागेचा प्रश्न कायम लटकला होता समाजकल्याण विभागाकडे मुलींचा १४ जुन २०२२ तर मुलांचा ६ जुन २०२२ रोजी प्रस्ताव जागेच्या मंजुरीसाठी पाठवला होता. यापुर्वी तहसिलदारांनी जागा उपलब्धीचे पञ पाठवून समाजकल्याणच्या वरिष्ठ अधिकारी सोबत हणमंतवाडी येथे जाऊन स्थळपाहणी करून त्या जागेचा प्रश्न सुटलेला होता. त्याला निधीची गरज होती. तो निधी मिळाला आहे.
मुलांचे वस्तीगृहासाठी जवळपास ८० हजार तर मुलींसाठी ४९ हजार मासिक भाडे मिळून १५ लाख ६० हजार रुपये शासनाला वर्षांला मोजावे लागत होते. मुलींच्या वसतिगृहाची क्षमता ७५ तर मुलांची १०० विद्यार्थ्यांची मान्यता असून जागेच्या अभावामुळे ८० विद्यार्थी तेथे राहू शकतात यामुळे शासकीय जागा मिळणे गरजेचे होते. आता हे सारे प्रश्न मार्गी लागेले आहेत.