Chakur Gharkul Yojana | चाकूर तालुक्यातील घरकुल योजनांच्या कामांचा अहवाल सादर करा : सभापती

विविध गावांमधून घरकुल योजनांबाबत तक्रारी
Gharkul Yojana
Gharkul Yojana Pudhari
Published on
Updated on

Chakur Gharkul Yojana

चाकूर : तालुक्यातील विविध गावांमधून घरकुल योजनांबाबत येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पंचायत समितीच्या सभापती जयश्री नागरगोजे यांनी घरकुल योजनांच्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

५ मे रोजी झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सभापती जयश्री नागरगोजे यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील सन २०२४ ते २०२६ या कालावधीतील प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना तसेच शबरी आवास योजना अंतर्गत मंजूर, पूर्ण व अपूर्ण घरकुलांची माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

Gharkul Yojana
Latur Crime News : अवैध गुटखाविरोधात कारवाई; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

सभापती नागरगोजे यांच्या सूचनेनुसार गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी पंचायत समितीच्या घरकुल विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावनिहाय पडताळणी करून मंजूर, सुरू असलेली व अपूर्ण घरकुले यांचा अहवाल तातडीने पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले.

या उपक्रमामुळे घरकुल योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी समोर येण्यास मदत होणार असून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करता येणार आहे. तालुक्यातील घरकुल योजनांची सद्यस्थिती स्पष्ट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news