Latur News : यादीतून नाव कमी; भाजपकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ
Latur News
यादीतून नाव कमी; भाजपकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
Published on
Updated on

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या स्वीकृत सदस्य म्हणून ऐनवेळी नाव वगळण्यात आल्याने संतप्त झालेले भाजपचे कार्यकर्ते संजय गीर यांनी सोमवारी (दि.१०) स्वतःवर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला

याबाबत अधिक माहिती अशी, भाजपच्या कोट्यातून दोन स्वीकृत सदस्यांची निवड होणार होती. भाजपचे गटनेते दीपक मठपती यांनी सुरुवातीला भीमा बेंबळकर आणि संजय गीर यांची नावे निश्चित केली होती. मात्र, ऐनवेळी संजय गीर यांचे नाव यादीतून बाद करून त्यांच्या जागी दुसरे नाव जाहीर करण्यात आले. ​आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून आणि पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाचा निषेध म्हणून संजय गीर यांनी संतापाच्या भरात अंगावर डिझेल ओतून घेतले. त्यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे उपस्थित इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातातील आगपेटी हिसकावून घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news