'त्या' युवक काँग्रेस अध्यक्षाला फाशी द्या; लातूरात भाजयुमोचे आंदोलन

'त्या' युवक काँग्रेस अध्यक्षाला फाशी द्या; लातूरात भाजयुमोचे काँग्रेस भवनसमोर आंदोलन
latur news
'त्या' युवक काँग्रेस अध्यक्षाला फाशी द्या; लातूरात भाजयुमोचे आंदोलनpudhari photo
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृत्तसेवा: शाळकरी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा शिक्षक म्हणून कार्यरत असणारा चंद्रपूर येथील युवक काँग्रेस पक्षाया अध्यक्ष अमोल लोंडे या नराधमास तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यानी या मागणीसाठी भाजपचे प्रदेश सचिव ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली लातूर येथील काँग्रेस भवन कार्यालयासमोर लातूर प्रामीण युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.

अत्याचार करणाऱ्या युवक काँग्रेस अध्यक्षाला फाशी झालीच पाहिजे, पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीला पाठीशी घालणान्या महाविकास आघाडीचा जाहीर निषेध, अशी आक्रमकपणे घोषणाबाजी करून भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकत्यांनी काँग्रेस भवन समोरील परिसर दणाणून सोडला होता.

यावेळी बोलताना ऋषिकेश कराड महाणाले की, काँग्रेसच्या पुढाच्याकडून हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिस यंत्रणेवर दबाव आणन आरोपीला पाठीशी घालण्याचा नीच प्रकार केला जात आहे. या घटनेबाबत नाना पटोले, विजय वडेट्टीवार, संजय राऊत, सुषमा अंधारे व इतर कोणत्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साथी प्रतिक्रिया दिली नाही. महाविकास आघाटीचे नेते आज का गाम आहेत असा सवाल करीत ऋषिकेश कराड यांनी अत्याचार करणाऱ्या अमोल लॉरे यास तत्काळ बेड्या ठोकून फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली.

काँग्रेस भवन समोर झालेल्या वा आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कण्वेकर, सहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमसाळे, लातूर ग्रामीण विधानसभा प्रभारी सरज लिंदे, अमर चव्हाण संजय ठाकूर, दत्ता सरवदे, यांच्यासह भारतीय जनता युवा मोर्चाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

latur news
भंडारा : सामूहिक बलात्कारातील ‘त्या’ नराधमांना फाशी द्या : भाजप महिला मोर्चाचे पोलीस प्रशासनाला निवेदन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news