Latur News | चंद्राच्या कुशीत शुक्राची लखलख; औसा तालुक्यात अवकाशातील अद्भुत नजारा

वैज्ञानिक कुतूहल जागवणाऱ्या खगोलीय घटनेने नागरिकांचे वेधले लक्ष; अंधश्रद्धेला नव्हे, विज्ञानाला द्या प्राधान्य
Ausa Sky Gazing
Sky GazingPudhari
Published on
Updated on

Ausa Sky Gazing

‎औसा : ‎औसा तालुक्यातील नागरिकांना सोमवारी सायंकाळी पश्चिम क्षितिजाकडे आकाशात चंद्र आणि त्याच्या अगदी जवळ चमकणारा तेजस्वी शुक्र ग्रह असे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले. चंद्रकोरीच्या शेजारी एखादी चांदणी लखलखत असल्याचा भास होत असल्याने अनेकांनी हे दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. काही काळासाठी हे दृश्य नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेचा विषय ठरले.

प्रत्यक्षात ही कोणतीही गूढ किंवा अपशकुनी घटना नसून चंद्र आणि शुक्राची युती होती. १४ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्राने शुक्रासमोरून जाण्याची चंद्र-शुक्र पिधानाची खगोलीय घटना देखील घडत आहे. भारतातील काही भागांत या घटनेचा शुक्र पुन्हा दिसण्याचा टप्पा पाहता येतो.

Ausa Sky Gazing
Latur News | चाकूर तालुक्यात सहकारमंत्र्यानी केली पीक परिस्थितीची पाहणी

कोट्यवधी किलोमीटरचे अंतर, तरीही जवळ असल्याचा भास!

‎आकाशात चंद्र आणि शुक्र एकमेकांना अगदी खेटून असल्यासारखे दिसले, तरी प्रत्यक्षात दोन्ही खगोलीय वस्तूंमध्ये प्रचंड अंतर आहे. पृथ्वीपासून चंद्राचे सरासरी अंतर सुमारे ३ लाख ८४ हजार किलोमीटर आहे, तर शुक्र पृथ्वीपासून कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असतो. त्यांच्या कक्षांतील हालचालींमुळे पृथ्वीवरून पाहताना ते एकमेकांच्या जवळ असल्याचा सुंदर भास निर्माण होतो.

‎१४ सप्टेंबरला महाराष्ट्रातूनही चंद्र संध्याकाळपर्यंत आकाशात दिसत होता आणि शुक्र सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला तेजस्वी दिसण्याच्या स्थितीत होता.

अंधश्रद्धेला थारा नको; आकाशाकडे वैज्ञानिक नजरेने पाहूया

‎अशा आकाशातील दुर्मीळ आणि सुंदर घटनांकडे पाहताना त्यांच्याबाबत विविध तर्क-वितर्क, गैरसमज किंवा अंधश्रद्धा पसरवण्याऐवजी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ग्रह-ताऱ्यांच्या हालचाली या निसर्गाच्या नियमांनुसार घडणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्यांचा मानवी जीवनावर अपशकुन किंवा शुभ-अशुभ असा थेट परिणाम होतो, याला वैज्ञानिक आधार नाही.

Ausa Sky Gazing
Latur Crime | चाकूर बायपासवर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

‎चंद्राच्या बारीक कोरीसोबत दिसणाऱ्या या तेजस्वी शुक्रामुळे औसा तालुक्यातील आकाश काही काळासाठी जणू निसर्गाने सजविलेल्या चित्रासारखे भासत होते. आकाशातील प्रत्येक अद्भुत दृश्य हे अंधश्रद्धेचे कारण नसून विज्ञान समजून घेण्याची एक संधी आहे, असा संदेशही या घटनेतून घेता येतो.

- ‎प्रा.संजीवकुमार अष्टुरे, भूगोल तज्ञ्, श्री कुमारस्वामी महाविद्यालय, औसा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news