

औसा : नागपूर - रत्नागिरी महामार्गांवर औसा शहरात औसा टीपॉईंट येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघातात एकजण जण ठार झाला आहे. नागपूर- रत्नागिरी महामार्गवर औसा शहरात प्रवेश करणाऱ्या मेंढा डेपोची बस क्रमांक MH14 LX 5734 बसला लातूर कडे जाणाऱ्या भरधाव ट्रक ने जोराची धडक दिली. बसच्या मागील भागाला जोरदार धडक बसल्याने बस वेगाने पुढे गेली. रस्त्याकडेला भाजीपाला विकण्यासाठी बसलेले तुकाराम बाजीराव जाधव ( वय 55 वर्ष ) राहणार करजगाव ता. औसा यांच्या अंगावर ही बस आल्याने बसखाली दबून जागीच मृत्यू.
आपल्या उपजीविकेसाठी भाजी पाला विकण्यासाठी बसलेल्या निरापराध गरीब शेतकऱ्यावर काळाने घाला घातल्याने पाहणारे हळ हळ व्यक्त करीत होते. समोर चौक असतानाही आपले वाहन निष्काळजी पणे व वेगाने चालवून बसच्या मागच्या भागास देऊन ट्रक तसाच पुढे वेगाने निघून गेला. अद्याप ट्रक व चालक फरार आहेत.
अनेक महिन्यापासून औसा शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते यांनी महामार्ग असल्याने उड्डाणं पुलाची मागणी केली. आमदार अभिमन्यू पवार यांनीही यासाठी पाठपुरावा केला पण अद्याप औसा येथे उड्डाणं पूलाला मुहूर्त लागलेला नाही. आणखी किती सामान्य व निरापराध जनतेचे बळी गेल्यावर उड्डाणं पूल होणार असा सवाल औसा येथील नागरिक करत आहेत. याबाबत औसा पोलिसात अज्ञात ट्रॅकचालक विरोधात गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिकचा तपास करत आहेत.