

उदगीर : उदगीर तालुक्यातील पिंपरी गावाजवळ महादेव मंदिरासमोर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून पसार झाला असून उदगीर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 रोजी मध्यरात्री ३ वाजण्याच्या दरम्यान पिंपरी ता. उदगीर जवळ महादेव मंदिरासमोर हा अपघात घडला. आरोपी पिकअप क्रं. एम एच १२ यु एम ५५०९ च्या चालकाने भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्रं. एम एच २४ ९२५४ ला जोराची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील बाबुराव संभाजी मुंढे वय ५३ वर्षे रा. एकुर्का (खु) ता. जळकोट जि. लातूर हल्ली मु. नांदेड नाका, उदगीर हे गंभीर जखमी होऊन मयत झाले.
या प्रकरणी मयताचे नातेवाईक शिवशंकर बाबुराव मुंढे वय ३० वर्षे रा. एकुर्का (खु) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा ३/११/२०२६ रोजी सकाळी ११:१ वाजता नोंद झाला आहे. अपघातानंतर आरोपी चालकाने जखमीस मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. या गुन्ह्याचा पुढील तपास पो उप, नि, पोवार मॅडम यांच्याकडे देण्यात आला असून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि डी. डी. गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पसार पिकअप चालकाचा शोध सुरू आहे