

लातूर: उदगीर तालुक्यातील करडखेल पाटीजवळ ट्रॅक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे. ही घटना रविवारी (दि.२१) दुपारच्या दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी (दि. २१) १२ वाजेच्या सुमारास उदगीर लातूर रोडवर करडखेल पाटीजवळ ट्रक (क्र. एपी ३९ यूएन ३६५९) व दुचाकी (क्र. एम एच २४ एझड ७२५४) या वाहनांचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील महादू शंकर जाधव (वय-३८ वर्ष, रा. कुमठा, ता. उदगीर) हे जागीच ठार झाले.
या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळताच ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.