Latur Accident | शेंदचे ग्रामसेवकांचा ट्रॅक्टरच्या धडकेत अपघाती मृत्‍यू!

अर्ध्यावरती डाव मोडला : ग्रामपंचायत सेवकांपासून ग्रामसेवक पदापर्यंत होते पोहचले
Latur Accident | शेंदचे ग्रामसेवकांचा ट्रॅक्टरच्या धडकेत अपघाती मृत्‍यू!
Latur Accident | शेंदचे ग्रामसेवकांचा ट्रॅक्टरच्या धडकेत अपघाती मृत्‍यू!
Published on
Updated on

निलंगा : शिरूरअनंतपाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा सेवक म्हणून असलेल्या प्रकाश राचूरे वय 41 याना सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती मिळाली अन् गावात पाणी सोडणाऱ्या सेवकाचा ग्रामसेवक झाला. परंतू नियतीलाही ते पचनी पडले नसेल.. अवघ्या कांही काळातच पदोन्नती मिळालेल्या प्रकाश राचूरे याचे आढावा बैठक आटोपून गावाकडे जात असताना शुक्रवारी ता. 4 रोजी निलंगा येथील उदगीर मोडजवळ अपघाती निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. सध्या ते शेंद ता. निलंगा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते.

याबातची माहिती अशी की, निलंगा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी यानी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला राचूरे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते कानेगाव ता. शिरूर अनंतपाळ मोटार सायकलीने गावाकडे जात होते. उदगीर मोड येथील पवार पेव्हर ब्लॉक समोर भरधाव ट्रॅक्टरने जोरात धकड दिली व डोक्यावरून ट्रॅक्टरचा मोठा टायर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रकाश राचूरे हे गावामध्ये ग्रामपंचायत सेवक म्हणून पाणी सोडण्याचे काम करत होते सेवकाच्या नियमानुसार त्यांना ग्रामसेवक म्हणून पदोन्नती मिळाली होती. पुढील सेवेचे आणखी सतरा वर्ष बाकी असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे अर्ध्यावरच त्यांचा स्वप्नाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती कळताच अनेक ग्रामसेवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गोविंद चिलगुरे यांच्यासह ग्रामसेवक व कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.

जागेवरच मृत्यू झाल्यामुळे त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे नेण्यात आले असून त्यांचे शिवविच्छेदन करून कानेगाव तालुका शिरूर अनंतपाळ येथे उद्या अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा एक मुलगी असा परिवार आहे अचानक त्यांच्या अपघाती निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news