

निलंगा प्रतिनिधी :- लातूर जहीराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील लांबोटा पाटी येथे हॉटेल राजवाडा जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कार ने मोटरसायकल स्वारास उडवले. याबाबत अधिक माहिती अशी की, शिरोळ (वां) येथील रहिवासी असलेले सतीश कांबळे आणि संजय दौलत कांबळे हे दोघे मोटरसायकल वरुन निलंगा हून शिरोळ कडे येत असताना लांबोटा पाटीवरील हॉटेल राजवाडा या ठिकाणी समोरून येणाऱ्या भरधाव कार(क्र. एम एच २४बी एल ४१८६)ने विरुद्ध दिशेला येऊन जोराची धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकल वरील दोघे उडून रस्त्यावर पडले आणि त्यातच सतीश कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवले. अपघातानंतर कारचा ड्रायव्हर पळून गेला असून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे असे समजते.
लातूर- जहीराबाद मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावर सारखे अपघात होत असतात. सिमेंट रस्त्याला भेगा पडल्या असल्यामुळे भेगा चुकवण्यासाठी वाहनधारक विरुद्ध दिशेने वाहन वेगाने मार्गक्रमण करताना सर्रास आढळून येतात. पोलीस प्रशासनाला अपघात स्थळावरून कळवण्यात आले असून निलंगा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत.