

Chakur municipal president candidate
चाकूर : नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी होऊ घातलेल्या निवडीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अब्दुल करीम गुळवे यांचा एकमेव अर्ज मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे.
कपिल माकणे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी बुधवारी ११ ते दुपारी २ पर्यंत वेळ निश्चित केली होती. त्यावेळेमध्ये राष्ट्रवादीचे अब्दुल करीम गुळवे यांचे दोन नामनिर्देशन पत्र दाखल झाले. पीठासीन अधिकारी लंबे यांनी दोन्ही नामनिर्देशन पत्राची छाननी केली.
दरम्यान एकाच उमेदवाराचे दोन्ही नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडीची पुढील प्रक्रिया २६ मे रोजी होणार आहे. या निवडीत अब्दुल करीम गुळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे ते या पदासाठी प्रबळ दावेदार असून नगराध्यक्ष पदाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.
याप्रसंगी उमेदवार अब्दुल करीम गुळवे, प्रभारी नगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, प्रथम नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, नगरसेवक भागवत फुले, अभिमन्यू धोंडगे, नितीन रेड्डी, मुज्जमील सय्यद उपस्थित होते.