Latur Mayor Election | लातूर महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे बिनविरोध

Latur Municipal Corporation | वंचित बहुजन आघाडीची ऐनवेळी माघार
Latur Municipal Corporation
Jayshree Sonkamble Latur MayorPudhari
Published on
Updated on

Jayshree Sonkamble Latur Mayor

लातूर : महापौर व उपमहापौर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे महापौरपदी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी ॲड. स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड झाली.

लातूर शहर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने 43, भाजपने 22, वंचित बहुजन आघाडीने 4 व राष्ट्रवादी काँग्रेसने 1 जागा जिंकली होती. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीची किती असल्याने या दोन्ही पक्षांची महापालिकेवर सत्ता आली. महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीत काँग्रेसने महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे व महापौर पदासाठी ॲड. स्नेहल उटगे यांची उमेदवारी दाखल झाले होती. तर विरोधी असलेल्या भाजपा निवडणुकीपासून लांब राहिली. मात्र सत्तेत एकत्र आलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत महापौर पदासाठी अंकिता सोमवंशी व उपमहापौर पदासाठी सचिन गायकवाड यांची उमेदवारी दाखल केली होती.

Latur Municipal Corporation
Latur crime news | लातूर रोड मतदान केंद्र परिसरात मारहाण, 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, सोमवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत महापौर व उपमहापौर पदांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी अर्जांची छाननी झाली आणि पुढील पंधरा मिनिटात वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौर पदासाठी काँग्रेसच्या जयश्री सोनकांबळे व उपमहापौर पदासाठी ॲड. स्नेहल उटगे यांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केली. यावेळी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत घोषणाबाजी केली.

वंचित आघाडीला पुढच्या टर्ममध्ये उपमहापौरपद

दरम्यान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा सचिव संतोष सूर्यवंशी यांनी माध्यमांसमोर येऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघार घेतले असल्याची माहिती दिली. वंचित बहुजन आघाडीला पुढच्या अडीच वर्षांच्या टर्ममध्ये उपमहापौरपद तसेच पुढील वर्षी स्थायी समितीमध्ये आणि चालू वर्षात महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद दिले जाणार असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news