लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सुमारे १४७ विद्यार्थ्यांत कावीळची लक्षणे आढळली असून वैद्यकीय पथकाकडून विद्यार्थ्यांची तपासणी सुरू आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत सुमारे १४७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वडगावे यांनी दिली. दूषित पाण्यामुळे ही लागण झाली असावी, असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे.
लातूरमधील या निवासी विद्यालयात ५ वी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी ४४५ विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथील २५ ते ३० विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांत काविळची लक्षणे आढळल्यानंतर शिक्षण व आरोग्य विभाग सतर्क झाला होता. गुरुवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची दोन पथके विद्यालयात तळ ठोकून होती. चार ते पाचच्या पुढे संशयीत आढळ्यास साथ घोषित करावी लागते त्याप्रमाणे ती घोषीत करण्यात आल्याचे डॉ. वडगावे यांनी सांगितले.
सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. लिव्हर टेस्टसाठी विद्यार्थ्यांचे रक्तनमुने घेण्यात आले असून ते निदानासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान या नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये कावीळची लक्षणे कशामुळे आढळली. यास जबाबदार कोण याची चौकशी करण्यासाठी उपविभगीय अधिकारी रोहिणी नहें विरोळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती समिती नेमण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर यातील वस्तुस्थितीचा उलगडा होणार आहे.
काविळचे पाच प्रकार आहेत. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये आढळून आलेला काविळ कोणत्या प्रकारचा हे हे तपासणी अहवालानंतरच कळणार आहे. कावीळचा संसर्ग हा शौचमिश्रित पाणी किवां अन्नातून होतो. नवोदय विद्यालयात पिण्याच्या पाण्याच्या तसेच स्वतंत्र पाईपलाईन आहेत. तथापि त्या जुन्या झाल्याने लिक होण्याची व पावसाच्या पाण्यामुळे त्याचे पाणी पिण्याच्या पाईपात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या अंदाजानेही तपास करण्यातल येत आहे. लातूर मधील याल घटनेची माहिती राज्याच्या आरोग्य विभागासही कळविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.