घरणीजवळ साडेपाच लाखांचा गुटखा, सुगंधीत तंबाखू जप्त

Latur Crime News | उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाची कारवाई
Latur Crime News |
घरणीजवळ साडेपाच लाखांचा गुटखा, सुगंधीत तंबाखू जप्तFile Photo
Published on
Updated on

चाकूर : तालुक्यातील नळेगाव-उदगीर महामार्गावर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला घेवून‌ जाणाऱ्या कारवर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी (दि.२) सकाळी ११ वाजताच्या सुमारास छापा टाकून‌ कार, मोबाइलसह पाच लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहायक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पथकाने उदगीर-नळेगाव रस्त्यावरील घरणी पुलावर सापळा रचून‌ सकाळी ११ वाजताच्या सुमारास कार‌वर छापा टाकला असता कारमध्ये तीन लोक होते. पोलिस पथकाने त्यांची चौकशी करुन कारची झडती घेतली असता त्यात विविध कंपनीचे पानमसाल्याचे डबे आढळून आले. यावेळी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला असा पाच लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या पथकात उपनिरीक्षक राजेश घाडगे,पोलिस कॉन्स्टेबल श्रीमंत आरदवाड, दिपक सोनकांबळे, सिराज शेख, जळबा देगावे, बाबासाहेब गुळवे आदी होते.

याप्रकरणी सिराज शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुकेश वाल्मीक लहाने, मनीष शंकरप्रसाद शुक्ला, निखिल मोरेश्वर घोडके या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश घाडगे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news