Latur News : लातुरातील डीपीडीसी बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी

पालकमंत्र्यांचा पारा चढला, कारवाईचे निर्देश
District Planning Committee Meeting
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेpudhari photo
Published on
Updated on

लातूर : गुरुवारी लातूर जिल्हा अधिकारी कार्यालयात पालकमंत्री, सहकारमंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबत पूर्वकल्पना असूनही काही अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पारा चढला. अधिकाऱ्यांची ही बेफिकिरी उपस्थित लोकप्रतिनींधीचीही नाराजी ओढावणारी ठरली. या पार्श्वभूमिवर पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याचा विकास तसेच अनेक प्रश्नांवर विचारमंथन होत असते. कामाचे प्राधान्यक्रम ठरवले जातात, निधीची तरतुद असे अनेक विषय या सभेत मांडले चर्चीले व सोडवलेही जातात. अनेकाविध विषयावर ही बैठक असल्याने सर्व विभागाच्या प्रमुखांनी या बैठकीस उपस्थित राहणे तसे बंधनकारक असते. विशेष म्हणजे या बैठकीबाबत संबधीतांना पूर्वकल्पना दिली जाते. नियोजन विभागाने ती दिली असेल. मात्र गुरुवारी मोहरमची सुट्टी असल्याने काहींनी हा विषय गार्भियाने घेतला नसावा माझ्या एकट्याच्या अनुपस्थितीने काय फरक पडणार असा स्वंयंतर्क कदाचित त्यांनी काढला असावा मात्र अशा तर्कज्ञानींचे संख्याबळ अधिक झाल्याने वास्तव समोर आले.

District Planning Committee Meeting
Suresh Dhas : प्रलंबित पाणंद रस्ते तातडीने पूर्ण करा

पालकमंत्री म्हणाले सुट्टी आम्हाला होती. मात्र बैठक महत्वाची, जिल्ह्याच्या हिताची असल्याने आम्ही मुबंईहून आलो. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आले. इतर लोकप्रतिनीधींनीही हजेरी लावली आम्हा सर्वांना सुट्टी नको होती का ? असा सवाल करीत असी दिरंगाई आता खपवून घेतली जाणार नाही असे पालकमंत्र्यांनी सुनावले.

दरम्यान आ. विक्रम काळे यांनी अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारीबद्दल आपण नाराजी व्यक्त केली असून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करण्याची मागणीही केल्याचे सांगितले. अनुपस्थितीत अधिकाऱ्यांची नेमकी संख्या सोमवारी कळेल असे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी रेड्डी दिलेल्या यादीनुसार सात अधिकारी या बैठकीस गैरहजर होते.

District Planning Committee Meeting
Raju Shetty | प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळेच उपसाबंदीचे संकट : माजी खासदार राजू शेट्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news