

नळेगाव, पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मियांच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक समजल्या जाणाऱ्या नवरोत्सवास गुरुवारी (ता. ३) घटस्थापनेने सुरुवात झाली. या सणातील नऊ दिवस में नऊ रात्रीचे महत्व लक्षात घेता अनेक महिला पुरुष भाविक देबीच्या उपासनेनिमित्त उपवास बरतात. या उपवासासाठी खाल्या जाणाऱ्या फळांच्या व विविध पदार्थांच्या दरात वाढ झाली असल्याने यंदा नवरात्रीचा उपवास मध्यगला आहे. असे असले तरी उपवासाच्या तयार खाद्य पदार्थाची बाजारात रेलचेल दिसून येत आहे.
नवरात्र सनातील उपवासानिमित्त कुटुंबातील काही व्यक्ती नहडा दिनसाचा उपवास करतात. तर काड़ी भाविक पहिल्या व शेवटच्या दिवशी उपवास करतात, यासाठी पारंपारिक घरगुती पदार्थ करण्याबरोबरच बाजारातून ही तयार उपवासाचे पदार्थ हमखास आणले जातात.
दरवर्षी कच्चा माल, खाद्यतेल, मजुरी आदींच्या दरात वाढच होत असल्याने त्यांच्या किंमती मागील व्यपिक्षा काहीशा वधारल्याचे दिसून येत आहे. उपवासाला लागणारा साबुदाणे शेंगदाणे यांचे दर वाढले आहेत. शिवाय तयार फराळांमध्ये मुख्यतः साबुदाणा चिवडा, बटाटा चिप्स, विक्री या पदार्थाच्या दरातही वाढ झालेली आहे. तसेच फळांमध्ये केळी, खजूर, बटाटा यांचेही दर किरकोळ वाढले आहेत.
सणासुदीच्या दिवसांत किराणा मालाच्या किमती वाढणे साहजिक आहे. ग्राहकांची मागणी आणि आवक यांचा मेळ जमत नसल्यामुळे दरवाड होत असते. कोणताच व्यापारी मनमानी दरवाढ करीत नाही.
सुनील बिराजदार, किराणा व्यापारी
संत्री, सफरचंद, केळी, पेरू या फळांना विशेष मागणी आहे. सणाच्या काळात फळे अधिक प्रमाणात खरेदी केली जातात आणि दर सुद्धा काहीसे बाडलेले दिसतात. फळांची आवक वाढली तर हे दर सामान्यांच्या आवाक्यात येतील. मात्र सफरचंद, केळी यांची आवक मंदावली आहे.
सलमान बागवान, फळ विक्रेता