

उदगीरः उदगीर तालुक्यातील सोमनाथपूरात परमेश्वर रावसाहेब आडे यांच्या घरी बुधवारी (२१ मे) दुपारी कंदोरीचा कार्यक्रम होता कंदोरीच्या कार्यक्रमात प्रसाद म्हणून दिलेले मटन खाल्ल्याने ११ जणांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. विषबाधा झालेल्या ११ जणांना उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पूजा रामेश्वर आडे, परमेश्वर आडे, हरिबा रतन जाधव, लक्ष्मण नामदेव राठोड, बालाजी खुशाल जाधव, रामेश्वर बालाजी पवार, प्रकाश सोमला पवार, पारूबाई बालाजी पवार, कविता प्रकाश पवार, मनीषा किशोर पाटील, विमलबाई काशिनाथ कांबळे, अशी विषबाधा झालेल्या नागरिकांची नावे आहेत. विषबाधा झालेल्या अकरा रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.