शॉर्टसर्किटमुळे लातुरात हॉटेलला आग; लाखोंचे नुकसान

अग्‍निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण
Fire breaks out at hotel in Latur due to short circuit
शॉर्टसर्किटमुळे लातुरात हॉटेलला आग; लाखोंचे नुकसानFile Photo
Published on
Updated on

लातूर : पुढारी वृत्तसेवा

येथील खोरी गल्लीत असलेल्या गरम मसाला या हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात हॉटेलमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे 30 ते 35 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून एक तासाच्या अथक प्रयत्नाने या आगीवर अग्निशमन दलास नियंत्रण आणणे शक्य झाले. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.

येथील खोरी गल्लीमध्ये घावटी यांची दोन मजली इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यात हे हॉटेल आहे. सोमवारी सकाळी या हॉटेल मधून धुराचे लोट येत असल्याचे निदर्शनास आले. काही कळते ना कळते तोच आग भडकली. अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी मिळून 20 अग्निशमन जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर, साहित्य असे 35 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news