Renapur Rain Damage : अतिवृष्टीने बाधित शेतकरी पुन्हा संकटात, कारेपूर मंडळात रानोमाळ फिरताहेत शंखी गोगलगायी

सतर्क राहण्याचे आवाहन
Renapur Rain Damage
Renapur Rain Damage : अतिवृष्टीने बाधित शेतकरी पुन्हा संकटात, कारेपूर मंडळात रानोमाळ फिरताहेत शंखी गोगलगायी File Photo
Published on
Updated on

Farmers affected by heavy rains are in trouble again, snails are roaming the forests in Karepur mandal

विठ्ठल कटके

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा: अतिवृतीमुळे खरीप पिकांवर आलेल्या आस्मानी संकटाला तोंड देत असतांनाच पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर मोठ्या शंखी गोगलगायीचे संकट समोर उभे राहिले आहे. अतिपावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आता रब्बीच्या पीकांना मोठ्या शंखी गोगलगायीचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारेपूर महसुल मंडळात व्हटी, सायगाव . खलंग्री व इतर गावांच्या परिसरात मोठ्या शंखी गोगलगायी रानोमाळ फिरतांना दिसत आहेत.

Renapur Rain Damage
Cloudburst Rain : रेणापूर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

जुलै २०२२ मध्ये रेणापूर तालुक्यात पैसा (मिलीपीड) व लहान शंखी गोगलगायीमुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाला व पूळबागांच्या ५१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपाय योजनांचा अवलंब करावा. असा सल्ला रेणापूर तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी दिला होता. पावसाळा सुरु झाला की गोगलगायी व पैसा (मिलीपीड) नैसर्गीकरित्या हमखास दिसतात.

एकदा त्यांचा प्रादुर्भाव वाढला की त्यावर नियंत्रण करणे खर्चीक तर असतेच परंतु ते आवाक्याबाहेर जाते. कृषी विभागाच्या शास्त्रज्ञांनी सुचविलेल्या उपायानुसार उन्हाळ्यात खोलवर नांगरणी करणे हा प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे गरजेचे असते. जेणेकरून जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी जमिनीवर येऊन कडक उन्हामुळे त्या नष्ट होतात. यावर्षी सततच पाऊस पडल्यामुळे जमिनीत सुप्त अवस्थेत असलेल्या मोठ्या शंखी गोगलगायी जमिनीवर आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Renapur Rain Damage
Latur News : रेणापूर तहसीलच्या दालनात टाकल्या गोगलगायी; सोयाबीनही दिले पेटवून

असा करा बंदोबस्त

बांधाच्या आतील बाजूने मेटाडीहाईड २.५ टक्के व सखेलकिल औषधीच्या गोळ्या बांधाच्या सात फुट अंतरावर टाकाव्यात, याला गोगलगाय आकर्षीत होऊन ती गोळीला चाटते त्यानंतर ती ४ ते ५ तासाने मरण पावते. रात्री शेतात गवताचे ठिग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रति एकरी दहा ठिकाणी ठेवावा. सकाळी त्या जमा करुन साबन किंवा मिठाच्या पाण्यात टाकुन नष्ट कराव्यात असे कृषी अधिकारी नितीन कांबळे यांनी सांगितले.

विषारी चुरमुरे टाकू नका

गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांही शेतकरी विषारी औषध चोळलेले चुरमुरे शेतात टाकुन गोगालगायीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र विषारी चुरमुरे खाल्याने पशु - पक्षी दगावण्याचा धोका असतो. त्यासाठी शेतकर्यांनी एकात्मिक किड व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. असा सल्ला तालुका कृषी अधिकारी नितीन कांबळे व कृषी पर्यवेक्षक गंगाधर कराड यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news