Latur Crime : १२ तासांत बनावट सोन्याच्या बिस्किटांची टोळी जेरबंद; ५ आरोपी अटक, ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur Crime
Latur Crimepudhari photo
Published on
Updated on

अहमदपूर : महिलांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून बनावट सोन्याची चार बिस्किटे, एर्टिगा कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी दोन महिलांच्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदपूर शहरात महिलांना हेरून १० ग्रॅम सोन्याचे बिस्किट देतो, त्याबदल्यात तुमचे सोन्याचे दागिने द्या, असे आमिष दाखवत आरोपी बनावट सोन्याची बिस्किटे देऊन फसवणूक करत होते. या गुन्ह्यांचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेऊन पाच जणांना अटक करण्यात आली.

Latur Crime
Beed development plan : बीडच्या विकासासाठी 623 कोटींचा आराखडा

आरोपींकडून ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी असलेले मंगळसूत्र (किंमत १२ हजार रुपये), ७ ग्रॅम सोन्याचे झुमके (किंमत २८ हजार रुपये), एर्टिगा कार (किंमत ५ लाख रुपये) तसेच बनावट सोन्याची चार बिस्किटे असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलिस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास राठोड, पोलिस अंमलदार तानाजी आरदवाड, हरिदास कांबळवाड, दत्ता इंद्राळे, विशाल सारोळे, गणेश चव्हाण आणि राष्ट्रपाल कांबळे यांनी केली.

Latur Crime
Bhokardan school bus : बसअभावी ८० विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news