Mehul Rathod Latur: वैद्यकीय क्षेत्रात खळबळ; कार थांबवली...भुलीचे इंजेक्शन घेतलं... डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल

Latur Latest News: या धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Latur News
Latur News : भुलीचे इंजेक्शन घेऊन डॉ. मेहुल राठोड यांनी जीवन संपवलेfile photo
Published on
Updated on

Latur Dr Mehul Rathod Death Case:

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर येथील प्रसिद्ध डॉक्टर स्व. ईश्वर राठोड यांचे एकुलते एक पुत्र आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड (४३) यांनी लातूर शहरानजीक अंबाजोगाई मार्गावर असलेल्या उड्डाणपूल परिसरात स्वतःला भुलीचे इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. या धक्कादायक घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Latur News
Illegal Sand Excavation : वाळूचोरीच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करा

मेहुल हे दोन दिवसांपासून काहीसे अस्वस्थ होते. बुधवारी सकाळी ते त्यांच्या कारमधून घराबाहेर गेले. लातूर शहरानजीक अंबाजोगाई रोडवर असलेल्या उड्डाणपूल परिसरात त्यांनी आपली कार थांबवून तेथेच स्वतःला भुलीचे इंजेक्शन टोचून घेतले. त्यानंतर कारमध्येच ते बेशुद्ध पडले.

सायंकाळ होऊनही ते घरी येत नसल्याने त्यांच्या पत्नी डॉ. प्रियंका यांनी त्यांना अनेकवेळा फोन केले. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने डॉ. प्रियंका यांनी याबाबत त्यांच्या नातेवाइकांना व नातेवाइकांनी पोलिसांना कळवले. मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी लातूर-अंबाजोगाई मार्गावरील एमआयटी रुग्णालयाजवळील उड्डाणपुलाजवळ रोडवर कार शोधून काढली.

Latur News
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

कारमध्ये ते बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जवळील फुलाबाई बनसोडे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, लातूर शहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळास भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news