Latur Rain : निलंगा तालुक्यात पावसामुळे पिकांना फटका

मुगाला कोंब, सोयाबीन, उडदालाही फटका; नुकसान भरपाई देण्याची मागणी
Latur Rain
Latur Rain : निलंगा तालुक्यात पावसामुळे पिकांना फटका File Photo
Published on
Updated on

Crops affected due to rain in Nilanga taluka

निलंगा, पुढारी वृत्तसेवा : निलंगा तालुक्यात १४ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे निलंगा तालुक्यातील निलंगा औराद शहाजानी, तांबरवाडी, हालसी, होसूर चिचोडी, निटूर, बसपुर, शिरोळ वा., केळगाव या गावातील शेतकऱ्याच्या शेती पिकाची अतोनात नुकसान झाले आहे.

Latur Rain
Plastic Bags : प्लास्टिक पिशव्यांवर मनपाचा 'स्ट्राइक', ९५० किलो प्लास्टिक जप्त

शेतातील सोयाबीन, मूग, उडीद है पौक भुईसपाट झाले असून मुगाच्या शेंगाला कोंब फुटले आहेत. यामुळे हजारो हेक्टरी पिके हातचे निघून गेले असून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना हा शेतकऱ्याला नेहमीच करावा लागत आहे यावर्षी खरिपाचे पीक सोयाबीन उडीद तूर मूग हे चांगले डोलत होते.

मात्र मागील चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे काढनिला आलेले मृगाच्या शेंगांना जागेवर कोम फुटून उगवले आहे. तर इतर पिके पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे. महसूल विभागामार्फत तहसीलदाराने शेतकऱ्याच्या शेती पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन सुद्धा कोणता आधीकारी हा शेतकऱ्याच्या बांधावर यायला तयार नाही.

Latur Rain
शिरूर अनंतपाळ तालुक्यात खडक तस्करीचा धंदा, 'पुढारी'च्या वृत्तानंतर प्रशासनाचे डोळे उघडले, ट्रॅक्टर जप्त

तहसीलदार प्रसाद कुलकर्णी सहज जाता जाता ते मांजरा नदीवरील ढोबळेवाडी-उजेड पुलावर येऊन पुलावरूनच शेतकऱ्याची पाहणी केली व निघून गेले. ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन सुद्धा प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्याच्या शेती पिकाला बघायला फिरकले सुद्धा नाहीत यामुळे शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी येऊन शेती पिकाचे पाहणी करावी व शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news