Chilli farming : उन्हाळ्यातही फुलली मिरची शेती; नदीवाडीच्या बिरादार यांचा आदर्श प्लॉट

नदीवाडी येथील शेतकरी रामदास शिवाजी बिरादार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिरची शेतीचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे.
Chilli farming
Chilli farming : उन्हाळ्यातही फुलली मिरची शेती; नदीवाडीच्या बिरादार यांचा आदर्श प्लॉटfile photo
Published on
Updated on

Chilli farming flourished even in summer; Ideal plot of the biradar of Nadiwadi

ज्ञानेश्वर भंडारे

वलांडी : नदीवाडी येथील शेतकरी रामदास शिवाजी बिरादार यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिरची शेतीचा सुंदर आदर्श निर्माण केला आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असते. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी शेती करण्यास टाळाटाळ करतात. मात्र रामदास बिरादार यांनी या आव्हानाला संधी मानत आपल्या शेतात मिरचीची लागवड करून उत्कृष्ट प्लॉट तयार केला आहे.

Chilli farming
रेशीम शेती ग्रामीण समृद्धीची नवी चळवळ व्हावी

मर्यादित पाण्याच्या उपलब्धतेतही योग्य नियोजन, वेळेवर मशागत आणि पिकाची निगा राखत त्यांनी मिरचीचे पीक जोपासले. परिणामी त्यांच्या शेतातील मिरचीचा प्लॉट हिरवागार व दाट दिसून येत असून परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Chilli farming
Latur windmill project : महसूलचा पवनचक्की कंपनीला दणका; २ लाख ५३ हजार दंड वसूल

रामदास बिरादार यांच्या मेहनतीमुळे आज त्यांचा मिरचीचा प्लॉट परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक शेतकरी त्यांचा प्लॉट पाहण्यासाठी येत असून त्यांच्या शेती पद्धतीची माहिती घेत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही शेतीतून चांगले उत्पादन घेता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे रामदास बिरादार होत. नदीवाडी गावातील या कष्टाळू शेतकऱ्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर आदर्श निर्माण केला असून परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात असून रामदास शिवाजी बिरादार हे नदीवाडी गावचे आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news