Chakur illegal electricity use : विकासकामांसाठी कंत्राटदारांनी अधिकृत वीज कनेक्शन वापरावे

चाकूर : पुढारीच्या बातमीचा परिणाम, सीईओंनी काढले लेखी पत्र
Chakur illegal electricity use
नगर पंचायत चाकूर pudhari photo
Published on
Updated on

चाकूर : नगर पंचायत हद्दीत सुरू असलेल्या विविध विकास कामांवर अनधिकृत वीजपुरवठ्याचा वापर होत असल्याचे पुढारीच्या बातमीतून उघडकीस आले आहे. याप्रकरणी विकास कामांसाठी कंत्राटदारांनी अधिकृत वीज कनेक्शन वापरण्याच्या मुख्याधिकाऱ्यांने लेखी पत्रातून कडक इशारा दिला आहे.

महावितरणच्या सहायक अभियंत्यांनी नगरपंचायतला दिलेल्या पत्रानुसार, शहरातील अनेक ठिकाणच्या विकास कामावर कंत्राटदारांकडून अधिकृत परवानगी न घेता वीज वापरून कामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढल्याचीही बाब समोर आली आहे.

Chakur illegal electricity use
Solapur News: रस्त्यांवर बेकायदा व्यापार करणाऱ्यांवर कारवाई

नगर पंचायत प्रशासनाला एमएसईबीने पाठविलेल्या पत्रानुसार सर्व संबंधित कंत्राटदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी तत्काळ अधिकृत विद्युत कनेक्शन घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा, संबंधितांवर भारतीय विद्युत कायदा 2003 अंतर्गत वीज चोरीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Chakur illegal electricity use
Uran illegal container yard : उरणमध्ये बेसुमार, अनधिकृत कंटेनर यार्ड

दरम्यान, अनधिकृत वीज वापरामुळे अपघात घडून जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यास संबंधित कंत्राटदार सर्वस्वी जबाबदार राहतील, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांमध्ये सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.या पार्श्वभूमीवर, चाकूरमधील सर्व विकास कामांवर अधिकृत वीज कनेक्शन घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

  • काही दिवसांपूर्वी शहरात विकास कामांसाठी गुत्तेदाराने अनधिकृत वीज कनेक्शन वापरून काम करीत आहे. हे वृत्त पुढारीतून प्रकाशित करून एमएसईबीच्या दुर्लक्षामुळे गुत्तेदार राजरोसपणे अनधिकृत वीज वापरत असल्याचे उजेडात आणताच एमएसईबी कार्यालयाकडून संबंधित गुत्तेदारास दंड लावला होता.दरम्यान एमएसबीईने नगरपंचायतला ही बाब कळविली. त्यामुळे नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी नगर पंचायत हद्दीत विकास कामांसाठी कंत्राटदारांनी अधिकृत वीज कनेक्शन वापरावे असे लेखी पत्राद्वारे गुत्तेदारांना कडक इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news