औसा शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

औसा शहरावर आता सीसीटीव्हीची नजर; आ. अभिमन्यू पवार यांनी आणला ३ कोटींचा निधी
latur news
औसा शहरावर आता सीसीटीव्हीची नजरpudhari photo
Published on
Updated on

औसा, पुढारी वृत्तसेवा : औसा शहराच्या व शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून शहरातील माता भगिनींची सुरक्षिततेत वाढ होऊन सामान्य नागरिकांसोबतच पोलिसावरील ताण कमी होऊन गुन् हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे.

औसा शहराचा दिवस विस्तार वाढत चालला असून अपवादात्मक परिस्थिती वगळता दररोज छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. यापूर्वी झालेल्या चोऱ्यांचा तपास लागण्यापूर्वीच पुन्हा चोरी घडत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे. तसेच शहरात जागोजागी शाळा कॉलेज च्या मुली, महिला यांची मोकार टोलक्याकडून शेरेबाजी करणे, छेड काढणे असे प्रकार सर्रास घडताना दिसतात पण पुराव्याअभावी कोणा बरही गुन्हा दाखल होत नाही आणि यातून अशा समाज विघातक लोकांची हिम्मत वाढत जाते. औसा शहरात कायदा व सुव्यस्था अबाधित राहवी, चोरीला व गुन्हेगारीला आळा बसावा व वाहतुकीवर नियंत्रण रहावे व शहरातील शांतता अबाधित रहावी. यासाठी औसा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशी मागणी नागरिकांकडून होत होती.

शहराचा वाढता विकास पाहता गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी नुकताच ३ कोटींचा निधी मंजूर करून आणला असून या निधीतून शहरातील मुख्य १८ रस्त्यावर सिसीटीव्ही ची नजर राहणार आहे. हे सर्व कॅमेरे हे मोठ्या शहरात वापरल्या जाणाऱ्या उच्च क्षमतेचे व उत्कृष्ट असे असणार आहेत. या सिसीटीव्ही कॅमेराचे नियंत्रण हे नगर परिषद व पोलीस स्टेशन, औसा येथून होणार असून हे कॅमेरे बसवल्याने शहरावर चोवीस तास नजर राहिल्याने अवैध धंदे, अवैध वाहतूक, गुन्हेगार यांच्यावर वचक राहणार आहे.

  • औसा शहर हे सुरक्षित, शांत, आणि स्वच्छ शहर व्हावे हे माझे धोरण असून याचाच एक भाग म्हणून मी शहरातील नागरिक आणि माता- भगिनीच्या सुरक्षित तेत वाढ व्हावी म्हणून मी सिसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ३०० कोटी निधी मंजूर केला असून या निधीतून साधे कॅमेरे न बसवता मुंबई, पुणे या मोठ्या शहरात असलेल्या उच्च प्रतीच्या सिसीटीव्ही कॅमेरे आपण औसा येथे बसवणार आहोत. यामुळे गुन्हेगारी, महिला, शाळेकरी मुली यांची होणारी छेड छाड, अश्लील शेरेबाजी थांबून हे शहर सुरक्षित करण्याचा माझा मानस आहे असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

latur news
नाशिकरोडला आता ३५ ठिकाणांवर २२५ सीसीटीव्हीची नजर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news