

उदगीर : उदगीर शहरालगत असलेल्या मलकापूर येथे एकाला मागील भांडणाची कुरापत काढून लोखंडी रॉडने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केले. व तसेच कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने घाव घालून २ दाते पाडले. याप्रकरणी सोमवारी (दि. ५ ) उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २९ एप्रिल रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मलकापूर येथील फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी फिर्यादीस मागील भांडणाची कुरापत काढली. फिर्यादी कामावरून येऊन त्याच्या घरासमोर थांबला असता रितेश गायकवाड याने त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून गंभीर जखमी झाले. त्याला ८ टाके पडले आहेत. तर राजपाल गायकवाड याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांडयाने तोंडावर घाव घातल्याने फिर्यादीच्या तोंडातील समोरील दात पडले. तिघांनी मिळून लाथाबुक्याने मारहाण करून मुक्का मार दिला व आईवडील, बहीण यांना पण शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण करून तुम्हाला खत्म करून टाकतो, अशी जीवे मारण्याची धममकीही दिली.
याप्रकरणी रत्नदीप हणमंत गायकवाड (रा.मलकापुर ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात रितेश नरसिंग गायकवाड, राजपाल नरसिंग गायकवाड, मनोज नरसिंग गायकवाड, नरसिंग मसनाजी गायकवाड, सचिन वाघमारे (सर्व रा. मलकापूर ता उदगीर) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल भिसे करीत आहेत.