अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी लातुरात महाआक्रोश मोर्चा

नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूप्रकरणी सकल मातंग समाज व विविध संघटनांच्या वतीने लातूर येथे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि.१६) मोर्चा काढण्यात आला.
latur news
अनुष्का पाटोळे मृत्यूप्रकरणी लातुरात महाआक्रोश मोर्चाfile photo
Published on
Updated on

Anushka Patole death case: Massive protest in Latur

लातूर, पुढारी वृतसेवा : नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूप्रकरणी सकल मातंग समाज व विविध संघटनांच्या वतीने लातूर येथे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (दि.१६) मोर्चा काढण्यात आला.

latur news
Latur Breaking | लातुरात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू : किरकोळ कारणातून दोन गटात वाद

मोर्चामध्ये सामील अनुष्काच्या आईने आक्रोश करीत मुलीने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा आरोप केला. अनुष्काला न्याय मिळावा, प्रकरणाची आत्महत्येकडे वळ-वणारी भूमिका थांबवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

कुटुंबीयांच्या मते, अनुष्काच्या मृत्यूला आत्महत्या म्हणण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नसून पोलिसांनी खुनाच्या अनुषंगाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाल दिलेल्या निवेदनात या प्रकरणी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करणे, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवणे, संबंधित पदाधिकाऱ्यांची चौकशी करून आर-ोपींवर कठोर कारवाई करणे, एसआयटी प्रमुख तपास अधिकारी बदलणे, मोबाईल सीडीआर तपासणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि दोषींना कठोर शिक्षा देणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक जी. ए. गायकवाड आणि सुरेश चव्हाण यांनी केले. आंदोलन शांततेत पार पडले. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

latur news
Latur Crime News : लातुरात कोयत्याने केलेल्या हल्ल्यात एका विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news