Latur News : दबाव टाकून रवी जाधव यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप

उमेदवारी कायम ठेवण्यासाठी ऋषिकेश कराड यांचे ठिय्या आंदोलन
Latur News
Latur News : दबाव टाकून रवी जाधव यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोपfile photo
Published on: 
Updated on: 

Allegation of forcing Ravi Jadhav to withdraw his candidature under pressure

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत रेणापूर तालुका विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेले रवी धनराज जाधव यांना धमकी देऊन उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणीकाँग्रेसचे उमेदवार सर्जेराव मोरे, शरद कदम यांच्यासह दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जाधव यांची उमेदवारी कायम ठेवावी, या मागणीसाठी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश कराड यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Latur News
Drought : दुष्काळात चारा उपलब्धतेसाठी लातूरचा उपक्रम राज्याला दिशादर्शक

जाधव यांच्या तक्रारीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी संबंधितांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना हॉटेल राजधानी येथे डांबून ठेवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. रात्री अकराच्या सुमारास तेथून बाहेर पडल्यानंतर जाधव यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

Latur News
Pangaon Vimal Agro Sugar Factory : सहा दिवसांनंतर पानगावचा साखर कारखाना सुरू

त्यानुसार दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अर्ज नामंजूर करून त्यांची उमेदवारी कायम ठेवावी, या मागणीसाठी कराड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या दालनात ठिय्या मांडला. नेटके उपस्थित नसल्याने सहनिवडणूक अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून संवाद घडवून आणला. शुक्रवारी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मिळाल्या -नंतर आंदोलन थांबविण्यात आले.

दरम्यान ऋषिकेश कराड यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंग सांळवे आणि पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांची भेट घेऊन संबंधितांना अटक करण्याची मागणी केली. एकीकडे काँग्रेस संविधान बचाव अभियान राबवते, तर दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत दडपशाही केली जाते का? असा सवाल कराड यांनी उपस्थित केला. जाधव यांना निवडणूक लढविण्याची संधी देऊन त्यांची उमेदवारी कायम ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.