

चाकूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना चाकूर येथे चाकूर वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आज बुधवारी सकाळी विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले.
त्या निधनाने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारच्या वतीने तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. चाकूर नगरपंचायतीच्या प्रांगणात अजितदादा पवार यांना समस्त चाकूरवासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी झालेल्या शोकसभेत नगराध्यक्ष करीम गुळवे, मुख्याधिकारी प्रतीक लंबे, नगरसेवक मिलिंद महालिंगे, विलासराव पाटील, नितीन रेड्डी, राम कसबे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बालाजी सूर्यवंशी, दयानंद सुरवसे, भाजपचे तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष हुसेन शेख, लिंगायत महासंघाचे शिवकुमार होळदांडगे, गणपत नितळे,सिद्धेश्वर अंकलकोटे, प्रा. डॉ. बी. डी. पवार, प्रा. दयानंद झांबरे,हणमंत लवटे,बिलाल पठाण, पत्रकार संग्राम वाघमारे, मधुकर कांबळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे, माजी सरपंच किशनराव रेड्डी, माजी उपसरपंच मुर्तूजा सय्यद, चाकूर बाजार समितीचे संचालक यशवंत जाधव,राहुल सुरवसे, अनिल वाडकर, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष गंभीरे, संजय पाटील, महमद सय्यद, बाबु दापकेवाले, मधुकर मुंढे, शिवशंकर हाळे, संदीप शेटे, समाधान डोंगरे, अजित सौदागर, गंगाधरअप्पा अक्कानवरू, साजिद लखनगावे, बालाजी भोरे, महेंद्र आचार्य, चंद्रमणी सिरसाठ,यांच्यासह नगरपंचायतीचे अधिकारी,कर्मचारी, शहरातील व्यापारी, पत्रकार व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.