Renapur News : रेणुका देवी मंदिरात भक्तिगीतांची मेजवानी

महिला भजनी मंडळाच्या भारुडे, गौळणी आणि जोगव्याने नवरात्रोत्सवात रंगत
Renapur News
Renapur News : रेणुका देवी मंदिरात भक्तिगीतांची मेजवानीfile photo
Published on: 
Updated on: 

A feast of devotional songs at the Renuka Devi Temple

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवातील चौथ्या माळेनिमित्त बुधवारी (दि. १४) लातूर येथील मानिनी भजनी मंडळाच्या महिलांनी भक्तिगीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. दुपारी ३ ते ६ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला दर्शनासाठी आलेल्या भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, रेणापूर येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या महिलांनी देवीची गाणी, भारुडे, गौळणी, जोगवा आणि चांदण अशी विविध भक्तिपर गीते सादर केली.

Renapur News
Housing Scheme : अखेर घरकुल लाभार्थ्यांना वाढीव हप्त्याचा दिलासा !

देवीच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात मंडळाच्या संस्थापिका शीमा आयाचित, अध्यक्षा साधना कुलकर्णी, उपाध्यक्षा नलिनी आष्टेकर, निलिमा देशमुख, सुमित्रा तारे, सुरेखा फुटाणे, मालिनी कुलकर्णी, माधुरी जेवरीकर, कुंदा टेकाळे, मनीषा अंबुरे, स्वाती देशपांडे, शिल्पा जोशी, वर्षा गौरवर आणि अंजुषा देशपांडे यांनी सहभाग घेतला.

Renapur News
Latur News : दुष्काळात चारा लागवडीचा पथदर्शी उपक्रम

ज्ञानेश्वर आष्टेकर यांनी मृदंगाची साथ दिली. कार्यक्रमानंतर मानिनी भजनी मंडळाच्या वतीने श्री रेणुका देवी मंदिर ट्रस्टचे सचिव गुरसिदप्पा उटगे, पुंडलीक इगे, मनोहर व्यवहारे यांच्यासह अन्य विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण मोटेगावकर, माजी सरपंच विठ्ठल कटके, दिलीप आकनगीरे आणि दत्ता जाधव गोंधळी यांच्या हस्ते मंडळातील महिलांचा सत्कार करण्यात आला. गुरसिद्धप्पा उटगे यांनी कार्यक्रमाचे संचालन करून आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news