Electricity Theft : तीन महिन्यांत परिमंडळातील ६९३ वीजचोरांचा पर्दाफाश

७१ लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी उघड
Electricity Theft
Electricity Theft : तीन महिन्यांत परिमंडळातील ६९३ वीजचोरांचा पर्दाफाश File Photo
Published on
Updated on

693 electricity thieves exposed in the circle in three months

लातूर, पुढारी वृत्तसेवा : वीजहानी कमी करण्याच्या दृष्टिने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात एप्रिल, मे व जून या गेल्या तीन महिन्यांत राबविलेल्या विशेष महामोहिमेत लातूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या सर्व विभागाच्या वीजचोरी बहुल भागात राबविलेल्या धडक कारवाईत तब्बल ६९३ वीजचोरून वापरणाऱ्यांवर महावितरणने आक्रमक कारवाई केली आहे. या कारवाईत आकडे टाकून वापरण्यात आलेल्या शेगड्या, हीटर व केबल जप्त करण्यात आले आहेत.

Electricity Theft
Chhava vs NCP clash| शासकीय विश्रामगृहात राजकीय पत्रकार परिषदेचा अधिकार कोणी दिला?

नियमित वीजबिल भरणाऱ्या वीजग्राहकांना अखंडित व योग्यदाबाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत तसेच धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागात धडक मोहीम हाती घेतली असून जास्त लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या व मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरून वापरणाऱ्या विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व उपविभागांना निर्देश दिले आहेत.

त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत राबविलेल्या धडक कारवाईत संशयास्पद अशा वीजग्राहकांची तपासणी केली असता ६९३ ग्राहक विविध मार्गाने वीजचोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तब्बल ७१ लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी झालेली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातील ३२३ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले.

Electricity Theft
Latur News : कृषिमंत्री कोकाटे यांना बडतर्फ करा, मराठा समाजाची मागणी

तर बीड जिल्ह्यातील २०६ वीजग्राहक तसेच धाराशिव जिल्ह्यातील १६४ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यासर्व वीजचोरांवरती वीजकायदा २००३ अनुसार कलम १३५ व १२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून वीजचोरीच्या बिलाची व दंडाची बिले तयार करून देण्याची कारवाई सुरू असून दिलेली बिले न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

वीजगळती कमी करण्याच्या दृष्टीने वीजचोरी विरोधात धडक मोहीम सातत्याने यापुढेही राबविली जाणार आहे. वीजचोरी करणे हा दंडात्मक गुन्हा असून महावितरण मागेल त्याला वीजपुरवठा देण्यास बांधील आहे. नागरिकांनी अधिकृतरीत्याच वीज वापरावी.
-अरविंद बुलबूले, मुख्य अभियंता लातूर परिमंडळ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news