

निलंगा; पुढारी वृत्तसेवा : निलंगा तालुक्यातील मौजे हासोरी येथे २ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे तीन धक्के बसले होते. त्यानंतर आज पुन्हा (दि. ४, बुधवार) रात्री ८:४९ व ८:५७ वाजता पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या धक्क्याने हासोरी येथील नागरिकांनी भयभीत होऊन घराबाहेर धाव घेतली.
गेल्या वर्षी प्रमाणे याही वर्षी भूकंपाची मालिका सुरू झाल्याने नागरिक रात्र जागून काढत आहेत. मात्र शासन व प्रशासन केवळ न घाबरण्याचा सल्ला देऊन मोकळे होत आहेत असे मत हासोरी वासियांकडून व्यक्त होत आहे. लवकरात लवकर तत्पुत्या निवाऱ्यासाठी पत्र्याचे किंवा फायबरचे शेड देण्यात यावे अशी मागणी हासोरीवसियांकडून करण्यात येत आहे.