लातूर : धारदार विळा घेऊन मनोरुग्णाचा औसा-तुळजापूर महामार्गावर थरार

लातूर : धारदार विळा घेऊन मनोरुग्णाचा औसा-तुळजापूर महामार्गावर थरार
Published on
Updated on

औसा, पुढारी वृत्तसेवा : येणाऱ्या -जाणाऱ्या व वाटेत दिसणाऱ्या प्रत्येकावर विळ्याने वार करून औसा-तुळजापूर हायवेवर बोरफळ गावात दहशत पसरवणाऱ्या मनोरुग्णाला औसा पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने जेरबंद केले. औसा तालुक्यातील बोरफळ गावातील मनोरुग्ण नेताजी विश्वनाथ मांजरे (वय ३५) याने शनिवारी (दि.२२) राष्ट्रीय महामार्गावर बोरफळ जवळ धाराशिव जिल्ह्यातील एका व्यक्तीवर या प्राणघातक हल्ला केला होता.

या घटनेनंतर सदरील जखमी व्यक्तीच्या तक्रारीवरून औसा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेजितवाड आपल्या कर्मचाऱ्यांसह रविवारी सायंकाळी ६ वाजता बोरफळ येथे पोहचले. यावेळी त्यांना गुंगारा देत मनोरुग्णांनी राष्ट्रीय महामार्ग गाठला. याठिकाणी जमलेल्या तरुणांनी सदरील मनोरुग्णाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या दोन्ही हातामधील धारदार विळ्याने तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक तरुण बालबाल बचावला गेला.

सदरील मनोरुग्णांनी राष्ट्रीय महामार्गावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केल्यावर जमलेल्या काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता या मनोरुग्णाला पकड ले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. औसा – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तीन तास सदरील थरार अनेकांचे ठोके चुकवणारा होता. मनोरुग्ण मोबाईल बोलत असलेल्या लोकांवर हल्ला करीत असल्याची माहिती समोर आली . त्या ला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news