Jalna News : जालन्यावर घोंगावते पाणी टंचाईचे संकट, प्रश्न जैसे थे

घाणेवाडी ऑक्सिजनवर, जायकवाडी गरज ६० एमएलडीची येते १५ एमएलडी
Jalna News
Jalna News : जालन्यावर घोंगावते पाणी टंचाईचे संकट, प्रश्न जैसे थेfile photo
Published on: 
Updated on: 

Water scarcity crisis looms over Jalna; situation remains unchanged

जालना : जालना शहरावर जानेवारीनंतर गंभीर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. तीन लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या शहरास दररोज ६० एमएलडी पाण्याची गरज असतानाच जायकवाडीतून केवळ १५ एमएलडी पाणी शहरास मिळत आहे. सध्या शहरात ८ ते १० दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन जालन्यास पाणीपुरवठा करणारा घाणेवाड़ी तलावात केवळ दीड फूट पाणी साठा असून घाणेवाडी कोरडा पडल्यानंतर नवीन व जुना जालन्याची भिस्त जायकवाडीच्या पाण्यावर राहणार असल्याने जानेवारीनंतर शहरावरील पाणीसंकट गंभीर होण्याचे चित्र आहे.

Jalna News
Jalna News : ढाकेफळच्या जलसंधारणाला लोकवर्गणीचे बळ

जालना पाणी प्रश्न गेल्या पंचवीस वर्षापासून सुटलेला नाही. उन्हाळ्यात पेटणारे जालन्याचे पाणी पावसाच्या पहिल्या सरी सोबत विझते. पाणी प्रश्नावर राजकीय नेते निवडणुका लढतात. निवडून येतात, त्यानंतरही पाणीप्रश्न सुटत नाही. जालन्यासाठी शहागड व पैठण येथील जायकवाडी सारख्या ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून पाणी पुरवठ्बाच्या योजना करोडो रुपये खर्च करून राबविण्यात आल्या.

मात्र जालनेकरांच्या नशिबी आलेली पाणी टंचाई नेत्यांना दूर करता आली नाही. शहरास घाणेवाडी व जायकवाडी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. घाणेवाडीमधून नवीन जालना तर आयकवाडीतून जुना जालन्यास पाणीपुरवठा केला जातो. घेतल्यानंतरही त्या पासुन धडा घेण्यात आल्याचे दिसत नाही.

Jalna News
MLA Hikmat Udhan : वीजबंदीच्या निर्णयात शिथिलता देण्यात यावी

दीड फूट पाणी

घाणेवाडी तलावात सध्या केवळ दीड फूट पाणीसाठा असल्याने आनेवारीनंतर नवीन व जुना जालन्यास जायकवाडीच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. सध्या दोन ठिकाणांहून पाणीपुरवठा होत असल्यामुळे शहरात आठ ते दहा दिवसांआड नागरिकांना पाणी देणे महापालिकेला शक्य होते. मात्र घाणेवाडी तलाव कोरडा पडल्यास शहरवासीयांवरील पाणी संकट गंभीर बनण्याची शक्यता आहे.

जालना शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या फिल्टर बेडची क्षमता कमी असल्याने नवीन ३५ एमएलडी फिल्टर बेडचे काम सध्या सुरू आहे. नवीन फिल्टर बेडवे काम ८० टक्के पूर्ण झाले असून ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करता येऊ शकेल.
पूनम राज स्वामी, सभापती पाणीपुरवठा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.