

Use of single-use plastic, punitive action by the municipality
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणाऱ्याविर-ोधात नगरपालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. अय्यंगार बेकरी चालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार दि. ३० रोजी करण्यात आली.
दरम्यान, भोकरदन नगर परिषदेच्या वतीने गरुवार दि. ३० पासून शहरात सिंगल यूज प्लास्टिक प्रतिबंध मोहिमे राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत अय्यंगर बेकरी (जालना रोड, भोकरदन) येथे तपासणी करण्यात आली असता सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आढळून आला.
या प्रकरणात पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन झाल्याने अय्यंगर बेकरीवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. ही कारवाई भोकरदन नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक संदीप वानखेडे, शाकीर पठाण, मोसिन बेग, व वाजेद शेख यांनी संयुक्तपणे केली.