

Use of frost irrigation, farmers worried due to lack of rain
मंठा, पुढारी वृत्तसेवा पावसाने मागील आठ-दहा दिवसांपासून ओढ दिल्याने खरीप हंगामाच्या सोयाबीनसह इतर पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. तर काही भागातील शेतकऱ्यांनी सुरुवातीस झालेल्या पावसावर पेरणी केली असून पावसाने आता उघड दिलेले शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी पेरणी आता तुषार सिंचनचा वापर करून पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांना लगबगीने सोयाबीन व इतर पिकांच्या पेरण्या आटोपल्या. मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेर-लेली पिके जगवावी कशी असा प्रश्नशेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तर जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी अद्याप पेरणी केलेली नाही.