

Two killed in bus-bike accident on Bhokardan-Jalna road
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
भोकरदन-जालना महामार्गावरील बाणेगाव फाट्याजवळ बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोनजण ठार झाले. हा अपघात शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास झाला.
भोकरदन येथून जालन्याकडे दुचाकी (क्र. एम एच २१बी डब्लू ८३३२) वरून जाणाऱ्या विकास जाधव तसेच भूषण लोखंडे यांना मानव विकासची बस (क्र.एम एच ०६ ८७००) ने धडक दिली. ही बस केदारखेड्याहून मुलींना घेऊन जात असताना हा अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील दोघेजण जागेवरच ठार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
पाऊस सुरू असल्यामुळे अपघात झाल्याचे समजते. रुग्णवाहिकेतून मृताचे शव नेण्यात आले. अपघातामुळे बसमध्ये असणाऱ्या शाळेतील मुली भयभीत झाल्या होत्या. बसचा चालक अपघात ठिकाणावरून निघून गेल्याने हा अपघात कसा झाला हे कळले नाही. यातील मुलींच्या शाळेत संपर्क केला. व तेथील काही शिक्षकांनी भरपावसातच मुलींना घरापर्यंत सोडल्याचे ऐकावयास मिळाले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.